केवळ भाषा म्हणूनच नव्हे, तर साहित्य, संस्कृती आणि परंपरेचादेखील समृद्ध वारसा लाभलेल्या मायमराठीला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा मराठी लोकांसाठी अभिमानाचा विषय आहे. त्यामुळे सकाळ समुहाच्यावतीनं अभिजात दर्जा मिळण्यासाठी लढणाऱ्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.