
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, संजय दत्त, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ अशा अनेक अभिनेत्यांची फौज असलेल्या 'हाऊसफुल ५' ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. ६ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना थिएटर पर्यंत खेचून आणलंय. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेर जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झालाय. तेव्हा चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभलाय. पहिल्याच दिवशी चित्रपटाने दमदार कमाई करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय. आता 'हाऊसफुल ५'च्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत.