Housefull 5 : साजिद नाडियाडवालाच्या ‘हाउसफुल’ फ्रँचायजीचा पाचवा भाग, ‘हाउसफुल ५’ आता अखेरच्या शेड्यूलमध्ये प्रवेश करत आहे. या लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायजीचा सन्मान करण्यासाठी टीमने एक स्टार-स्टडेड फोटो लॉन्च केला आहे..‘हाउसफुल ५’ भारतीय चित्रपटसृष्टीत एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे, कारण हा पाच भागांपर्यंत पोहोचणारा पहिला चित्रपट फ्रँचायजी आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, फरदीन खान, जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा, नरगिस फाखरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, डिनो मोरिया, चित्रांगदा सिंग, रणजित, सौंदर्या शर्मा, निकितीन धीर यांसारख्या कलाकारांचा सहभाग आहे. ‘हाउसफुल ५’चे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले असून चित्रपट ६ जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा.Naga & Sobhita Wedding : नागा चैतन्य-शोभिता धुलिपालाचा विवाह सोहळा पार पडणार डिसेंबरमध्ये.हाऊसफुल्ल या चित्रपटाचे वेगवेगळे भाग पाहण्यासाठी प्रेक्षक कायमच आतुरतेने वाट पाहत असतात. या आधीच्या देखील सर्व एक ते चार हाऊसफुल्ल चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हाऊसफुल्ल चार मध्ये ऐतिहासिक काळातील पुर्न:जन्मा वरील स्टोरी दाखविण्यात आली होती. यामुळे त्या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड डोक्यावर घेतलं. साजिद नाडीयावालाच्या एका हून एक चित्रपटांना प्रेक्षक वर्ग कायमच दाद देत असतो..मात्र, पुढच्या वर्षी रिलीज होणाऱ्या हाऊसफुल्ल ५ आणि त्यामध्ये असणाऱ्या दिग्गज कलाकारांच्या सहभागाने ह्या चित्रपटाला प्रेक्षक वर्ग किती प्रेम देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.