टायगर श्रॉफ फुटबॉल खेळायला टर्फवर गेल्याचं हल्लेखोरांना कसं समजलं? पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

How Attackers Learned Tiger Shroff Location And Where He Is: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर हल्ला झाला. मात्र तो तिथे आहे हे हल्लेखोरांना कसं समजलं याची एक शक्यता पोलिसांनी सांगितलीये.
tiger shroff location

tiger shroff location

esakal

Updated on: 

'बाघी', 'स्टुडन्ट ऑफ द इयर' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला लोकप्रिय अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर काल संध्याकाळी ७ वाजता जुहू येथील पुष्पा पार्क येथे तीन अज्ञात व्यक्तींनी थेट गोळीबार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात त्याच्या चालकाला गोळी लागली असून टायगर या जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. रविवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास फुटबॉलचा सामना खेळून परतत असताना टायगरवर हल्ला झाला. मात्र अनेकांना असा प्रश्न पडला की टायगर नेमका कुठेय हे त्या हल्लेखोरांना कसं समजलं? आता पोलिसांनी याबाबतीत वेगळीच शक्यता वर्तवलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com