

purnima talwalkar
ESAKAL
'होणार सून मी या घरची' मधील बेबी आत्या म्हणून घरघरात पोहोचलेल्या लोकप्रिय अभिनेत्री पूर्णिमा तळवलकर यांनी मराठीसोबतच हिंदीमध्येही काम केलंय. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय. त्या 'मन उडू उडू झालं' मधेही झळकल्या होत्या. त्या सध्या 'तुला जपणार आहे' या मालिकेत दिसतायत. मात्र त्यांनी हिंदी मालिका आणि चित्रपट देखील केलेत. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काजोल आणि अजय देवगनसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केलाय.