
अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचं नाव सध्या सगळ्यांच्या तोंडावर आहे. त्याचं कारण म्हणजे तिची नवीन येणारी मालिका. तेजश्रीने 'होणार सून मी ह्या घरची' मधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. पुढे ती 'अग्गबाई सासूबाई', 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत दिसली. मात्र तिने 'प्रेमाची गोष्ट' मालिका मध्येच सोडली. त्यानंतर चाहत्यांना अनेक प्रश्न पडले होते. आता तेजश्री पुन्हा एकदा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. त्यात तेजश्री आणि तिच्या भावाचं नातं दाखवण्यात आलंय. आता तिच्या ऑनस्क्रीन भावाने तेजश्री सेटवर कशी वागते याबद्दल सांगितलं आहे.