
अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल ५' ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाने रिलीजच्या आधीच कोट्यवधींची कमाई केली होती. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. आज ६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये 'हाऊसफुल ५' प्रदर्शित झाला आहे. अॅडव्हान्स बुकिंगदरम्यान या चित्रपटाची तब्बल ४५ हजार तिकिटे विकली गेली होती. त्यामुळे या चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभणार हे निश्चित होतं. मात्र या चित्रपटाचे २ क्लायमॅक्स प्रेक्षकांना पसंत पडलेत का, हा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला हे आता ट्विटर रिव्ह्यूवरून समोर आलंय.