

BADS OF BOLLYWOOD
ESAKAL
नेटफ्लिक्सची बहुप्रतीक्षित सीरिज ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ नुकतीच प्रदर्शित झाली आहे. आर्यन खान लिखित आणि दिग्दर्शित या सीरिजमधून बॉलीवूडच्या अनेक आख्यायिकावर उपरोधिक ताशेरे ओढण्यात आले आहेत. एक ‘आउटसायडर’ आणि एक ‘नेपो किड’ यांना केंद्रस्थानी ठेवून कथानक रचताना या दोघांचाही दृष्टिकोन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला आहे.