

madhuri dixit
esakal
बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून ओळख असणारी लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना प्रेमात पाडलं. तिने पाठीशी कुठलाही गॉड फादर नसताना स्वतःच्या हिमतीवर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केलं. ती उत्कृष्ट नृत्यांगना आहे. तिच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडली. आज ती ५८ वर्षांची आहे. मात्र आजही तिच्या सौंदर्यात तसूभरही फरक पडलेला नाही. फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत ती आजही कित्येक बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकते. तिच्या चेहऱ्यावर असलेला तजेलदारपणा पाहून तरुणीही तिच्या प्रेमात आहेत. मात्र तिच्या या नितळ त्वचेचं नेमकं रहस्य तरी काय?