
९० च्या काळातला सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणजे 'देवदास'. या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलेलं. चित्रपटाची कथा आणि कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. यामध्ये शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित हे कलाकार झळकले होते. यातील गाणी तर आजही प्रेक्षकांच्या तोंडावर आहेत. या चित्रपटात एक सीन आहे ज्यात पारो म्हणजेच ऐश्वर्या राय देवला म्हणजेच शाहरुखला शेवटचं पाहायला धावत जाते. तेव्हा तिच्या साडीला शेवटी आग लागल्याचं दाखवण्यात आलंय. ती साडी बरीच लांब आहे. ही साडी नेमकी कशी तयार झालेली याबद्दल चित्रपटाच्या कॉस्ट्यूम डिझायनरने खुलासा केला आहे.