
Nivedita Saraf: मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री आणि अभिनेते अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ आज ५९ वर्षांच्या झाल्या. अशोक सराफ आणि निवेदिता यांची जोडी प्रेक्षकांची अत्यंत लाडकी आहे. खरं प्रेम काय असतं हे या जोडीने दाखवलं. इतक्या वर्षांचा सुखी संसार आणि एकमेक्नाची साथ या बळावर ही जोडी आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. रंगभूमी, सिनेमा, मालिका या तीनही माध्यमांमध्ये सहज अभिनय कसा असावा हे निवेदिता यांच्याकडे पाहून कळतं. आज निवेदिता यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची एकूण संपत्ती आपण जाणून घेणार आहोत.