
tejashree pradhan and shashank ketkar
esakal
अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता शशांक केतकर यांची गाजलेली मालिका म्हणजे 'होणार सून मी या घरची'. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अगदी ३ वर्ष चाललेली ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती होती. शशांक आणि तेजश्री यांनी साकारलेली जान्हवी आणि श्री प्रेक्षकांचे लाडके होते. त्यांची जोडी खरंच खूप लोकप्रिय ठरली होती. प्रेक्षकांचा आनंद तेव्हा वाढला जेव्हा या दोघांनी खऱ्या आयुष्यातदेखील लग्न गाठ बांधली. मात्र वर्षभरातच त्यांनी घेतलेल्या घटस्फोटाच्या निर्णयाने सगळेच चकीत झाले होते. त्यानंतर ते सेटवर एकमेकांचा चेहरा पाहणं देखील पसंत करत नव्हते.