AISHWARYA RAI SALMAN KHAN
ESAKAL
Premier
फक्त म्हणायला मिस वर्ल्ड... ब्रेकअपनंतर अशी झालेली ऐश्वर्या रायची अवस्था; दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाले- सगळ्यांनी सलमानची बाजू घेतली पण...
AISHWARYA RAI SITUATION AFTER BREAKUP WITH SALMAN KHAN : लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला सलमानसोबत ब्रेकअप झाल्याचं जितकं दुःख झालं नाही तितकं इंडस्ट्रीकडून मिळालेल्या वागणुकीचं वाईट वाटलं.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान यांच्या अफेअरबद्दल आजही जोरदार चर्चा केली जाते. 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांचं नातं जवळपास वर्षभर होतं. मात्र २००२ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. हा ऐश्वर्याच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट काळ होता. या ब्रेकअपमुळे तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर परिणाम झाला. मात्र त्या काळात ऐश्वर्या जेवढी ब्रेकअपमुळे दुःखी नव्हती त्यापेक्षा जास्त तिला इंडस्ट्रीकडून मिळालेल्या वागणुकीमुळे दुःखी होती. तिच्या त्या वाईट काळाबद्दल लोकप्रिय दिग्दर्शक प्रल्हाद कक्कर यांनी एका मुलाखतीत सांगितलंय.