

kajalmaya
ESAKAL
छोट्या पडद्यावर महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या पैकी काही मालिका प्रेक्षकांना भावल्या तर काहींची बत्ती गुल झाली आणि त्यांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. झी मराठी, स्टार प्रवाह आणि कलर्स मराठी या तीनही वाहिन्या नवनवीन विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. त्यात नुकतीच स्टार प्रवाहने 'काजळमाया' ही आगळीवेगळी हॉरर मालिका सुरू केली आहे. नुकताच या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी त्यांना ही मालिका कशी वाटली हे सांगितलं आहे.