Hrithik Roshan & John Abraham : जॉन आणि हृतिकमध्ये आहे हे खास कनेक्शन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

John and Hrithik have special childhood connection : अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यात एक खास कनेक्शन आहे. काय आहे हे नातं जाणून घेऊया.
Hrithik Roshan & John Abraham : जॉन आणि हृतिकमध्ये आहे हे खास कनेक्शन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Entertainment News : सोशल मीडियावर कधी कोणत्या गोष्टीची चर्चा होईल याचा अंदाज लावता येत नाही आणि सध्या शाळेतील मुलांच्या ग्रुपचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये अशी दोन लहान मुलं आहेत जी आताची सुपरस्टार आहेत. कोण आहेत हे दिग्गज जाणून घेऊया.

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका फॅन पेजने शाळेचा ग्रुप फोटो शेअर केलाय आणि या ग्रुप फोटोमध्ये अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेता जॉन अब्राहम दिसत आहेत. या फोटोवरून जॉन आणि हृतिक हे वर्गमित्र होते हे रिव्हील झालं आहे. शाळेच्या युनिफॉर्म मध्ये असणारा हृतिक आणि एनसीसीच्या युनिफॉर्ममध्ये दिसणाऱ्या जॉनने सध्या सोशल मीडियाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

बॉम्बे स्कॉटिश शाळेत असतानाचा हा हृतिक आणि जॉनचा फोटो आहे. या फोटोला या फॅनपेजने "हृतिक आणि जॉन बॉम्बे स्कॉटिश शाळेत वर्गमित्र होते. म्हणजे कबीर आणि जिमची पार्टनरशिप एवढी जुनी आहे तर..." असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, हृतिक आणि जॉनने आजवर एकत्र कधीच काम केलं नाहीये पण त्यांनी एकाच सिनेमाच्या फ्रॅन्चायजीमध्ये बऱ्याचदा काम केलं आहे. 'धूम' सिनेमाच्या फ्रँचायजीमध्ये या दोघानींही काम केलं होतं. या सिनेमाच्या पहिल्या भागात जॉन दिसला होता तर सिनेमाच्या दुसऱ्या भागात हृतिकने चोराची भूमिका साकारली होती.

तर यश चोप्रा निर्मिती संस्थेच्या स्पाय युनिव्हर्स फ्रॅन्चायजीमध्येही या वर्गमित्रांनी काम केलं आहे. वॉर सिनेमात हृतिकने कबीर ही भूमिका साकारली होती तर पठाण सिनेमात जिम या फितूर झालेल्या गुप्तहेराच्या भूमिकेत जॉन दिसला होता.

Hrithik Roshan & John Abraham : जॉन आणि हृतिकमध्ये आहे हे खास कनेक्शन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
'Hrithik Roshan Post : '12 th फेल' पाहिल्यानंतर 'फायटर' ऋतिक झाला भावूक, काय म्हणाला माहितीये?

त्यांच्या या व्हायरल झालेल्या फोटोमुळे सध्या सोशल मीडियावर खळबळ उडाली असून त्या दोघांचे चाहते त्यांनी एकत्र काम करावं अशी मागणी करत आहेत. आता याबाबत हृतिक आणि जॉन काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहीलं आहे.

दरम्यान, जॉनचा 'वेदा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला होता तर 'पठाण' सिनेमातील त्याची भूमिका गाजली होती. तर हृतिकचा काही महिन्यांपूर्वी 'फायटर' हा सिनेमा रिलीज झाला. दीपिका पदुकोणसोबतची त्याची या सिनेमातील केमिस्ट्री खूप चर्चेत राहिली. तर लवकरच त्याचा 'वॉर २' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Hrithik Roshan & John Abraham : जॉन आणि हृतिकमध्ये आहे हे खास कनेक्शन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Hrithik Fighter Trailer Review : विशेष काही नाही, तेच ते... देशभक्तीच्या नावाखाली लोकांना वेडं करण्याचा प्रयत्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com