
'दुल्हे की सालियो, हरे दुपट्टे वालियो' हे गाणं जो पर्यंत लग्नात वाजत नाही तोपर्यंत सोहळा पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. ९० च्या दशकात तुफान गाजलेलं हे गाणं होतं ''हम आपके हैं कौन' या चित्रपटातलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड केले. या चित्रपटातील कलाकार आणि कथानक दोन्ही प्रेक्षकांना पसंत पडलेलं. चित्रपटातील गाण्यांची तर तऱ्हाच न्यारी. प्रत्येक गाणं आजही प्रेक्षकांच्या तोंडावर असतं. 'दीदी तेरा देवर दिवाना' असो किंवा 'वाह वाह रामजी' असो, 'ये मौसम का जादू है मितवा' असो किंवा 'बाबुल जो तुने सिखाया' हे गाणं असो. आजही ही गाणी सगळ्यांच्या मनात पिंगा घालतात. मात्र या चित्रपटासाठी कुणाला किती मानधन मिळालं होतं हे माहितीये का?