
९० च्या दशकात सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेला चित्रपट म्हणजे 'हम आपके है कौन' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई केली होती. हा चित्रपट पाहिला नाही असा व्यक्ती भेटणं अवघडच. या चित्रपटातील प्रत्येक सीन, संवाद आणि गाणी प्रेक्षकांच्या हृदयावर कोरली गेली. या चित्रपटात सलमान खान, रेणुका शहाणे, माधुरी दीक्षित, मोहनीश बेहल, रीमा लागू यांसारखे कलाकार होते. रेणुका यांनी चित्रपटात पूजेची भूमिका केली होती. या चित्रपटाच्या काही आठवणी त्यांनी आता एका मुलाखतीत सांगितल्या आहेत.