
Humaira Asghar Ali: पाकिस्तानी अभिनेत्री हुमैरा असगर अली ही तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आलीय. ३२ वर्षीय हुमैराचा मृत्यू दोन आठवड्यापूर्वी झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कराचीतील डिफेन्स हाउसिंह अथॉरिटीच्या एका अपार्टमेंटमध्ये ती राहत होती. मृत्यूनंतरही १०-१५ दिवस याची माहिती कोणालाच नव्हती.