Ila Arun News : परवानगी घेण्यात आली नव्हती.. ‘चोली के पीछे’च्या रिक्रिएशनवर इला अरुण नाराज

क्रिती सेनॉन, करीना कपूर आणि तब्बू यांचा चित्रपट ‘क्रू’ थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिन्ही अभिनेत्री एअर होस्टेसच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्यांची क्रेझ खूप वाढली आहे.
Ila Arun News
Ila Arun Newssakal

क्रिती सेनॉन, करीना कपूर आणि तब्बू यांचा चित्रपट ‘क्रू’ थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिन्ही अभिनेत्री एअर होस्टेसच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्यांची क्रेझ खूप वाढली आहे. या चित्रपटातील गाणीही चर्चेत आहेत. इला अरुणच्या आवाजात गायलेले ‘चोली के पीछे’ हे मूळ गाणे बॉलिवूडमधील आयकॉनिक गाण्यांपैकी एक आहे.

‘खलनायक’ चित्रपटात माधुरी दीक्षितवर चित्रित झालेले हे गाणे प्रेक्षकांना खूप आवडले होते. आता पुन्हा एकदा ‘क्रू’ चित्रपटात नव्या ट्रॅकसह हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. मात्र, जेव्हापासून हे गाणे रिलीज झाले आहे, तेव्हापासूनच याविषयी नवीन वाद सुरू झाला आहे. या गाण्याची मूळ गायिका इला अरुण हिनेही या गाण्यावर प्रतिक्रिया दिली. एका मुलाखतीत तिने सांगितले की, या गाण्याबाबत माझ्याकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच या गाण्याच्या नवीन व्हर्जनबाबतही त्यांना कोणतीही माहिती मिळालेली नाही.

हे गाणे अलका याज्ञिक आणि इला अरुण यांनी गायले होते आणि आता ‘क्रू’ चित्रपटातही त्यांचा आवाज वापरण्यात आला आहे. मात्र, या गाण्याला मध्यभागी दिलजित आणि आयपी सिंग यांचा आवाजही आहे. इला म्हणाली की, हे गाणे लॉन्च होण्यापूर्वी फक्त पाच मिनिटे तिला सांगण्यात आले होते. या गाण्याच्या म्युझिक कंपनीसोबत तिचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे, म्हणूनच जर तिला आधीही याविषयी सांगितलं असतं, तर ती नाकारू शकली नसती. पण, असे गाणे रिक्रिएट होत असेल, तर त्यात मूळ कलाकारालाही काम मिळायला हवे आणि नफ्यातील काही हिस्सा त्यांनाही मिळायला हवा, असे ती म्हणाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com