
'मेरे ब्रदर की दुल्हन' फेम बॉलिवूड अभिनेता इम्रान खान याने फार थोडे चित्रपट करत बॉलिवूडला रामराम ठोकला. मात्र त्याचं वैयक्तिक आयुष्य कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत राहिलं. इम्रानने पत्नी अवंतिकापासून लग्नाच्या ८ वर्षानंतर घटस्फोट घेतला. त्याने २०११ मध्ये अवंतिकासोबत विवाह केला होता. मात्र २०१९ साली तो पत्नीपासून वेगळा झाला. त्यांना एक मुलगी आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत इम्रानची पत्नी अवंतिकाने त्यांच्या घटस्फोटावर भाष्य केलंय. सोबतच तो काळ तिच्यासाठी किती कठीण होता हेदेखील सांगितलंय.