

punha ekda sade made tin
ESAKAL
लोकप्रिय दिग्दर्शक अंकुश चौधरी याच्या 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होती. आता अखेर या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. यावेळेस जास्तीचा गोंधळ, जास्त गैरसमज आणि जास्तीची धमाल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कुरळे बंधू चाहत्यांच्या भेटीला येतायत. रतन, मदन आणि चंदन यांच्या आयुष्यातील अतरंगी घटना या ट्रेलर मध्ये दिसतायत. मात्र रतन, मदन आणि चंदन यांच्यासोबतच स्टार प्रवाहचे काही कलाकारही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.