Ajanta Verul Film Festival 2025 : भारतीय सिनेमांची भुरळ सातासमुद्रापार; महोत्सवात फिप्रेसी कार्यशाळेत मान्यवरांचे प्रतिपादन
FIPRESCI : भारतीय चित्रपटसृष्टीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेले प्रभावी अस्तित्व फिप्रेस्की कार्यशाळेत मान्यवरांनी स्पष्ट केले. राज कपूरपासून ते 'आरआरआर' आणि 'स्लमडॉग मिलियनेयर'पर्यंत भारतीय सिनेमाने सातासमुद्रापार प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
छत्रपती संभाजीनगर : बॉलीवूडला भारतीय चित्रपटसृष्टीच्या प्रवासाचे प्रतीक मानले जाते. १९७० च्या दशकात आलेल्या समांतर चित्रपट चळवळीने अंकुर आणि भूमिका यांसारख्या वास्तववादी चित्रपटांद्वारे बॉलीवूडच्या साचेबद्ध कथांना एका वेगळ्या पद्धतीने सादर केले.