

Indian Idol Fame Singer Debut In Marathi Movie As An Actor
esakal
Entertainment News : “प्रेम कसे करायचे ते अनेक लोक शिकवतात, मात्र ते प्रेम कसे विसरायचे, हे कोणी शिकवत नाही”. प्रेम कधीही, कुठेही होऊ शकते. प्रेमाला कोणत्या वयाचे बंधन नसते. आवडणारी व्यक्ती आयुष्यातून अचानकपणे निघून जाऊन, अनेक वर्षांनी ती व्यक्ती आपल्या समोर आली तर पुढे काय होईल? याची रंजक गोष्ट "तुला पाहता" या चित्रपटातून उलगडणार आहे. 'तुला पाहता' हा चित्रपट ७० च्या दशकापासून ते आजच्या काळापर्यंतच्या तीन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करतो.