Indian Idol Singer Pawandeep Rajan: 'इंडियन आयडॉल'मधील लोकप्रिय गायक पवनदीप राजनचा भीषण अपघात झाला आहे. पवनदीपचा रुग्णालयातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये पवनदीप बेडवर झोपला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं दिसतय. फोटो पाहून चाहत्यांना त्याच्या तब्येतीची काळजी लागली आहे.