

Indrani Mukherjee Returns to Stage with 'Chitrangada'
Sakal
रवींद्रनाथ टागोरांच्या काव्यनाट्यावर आधारित ‘चित्रांगदा - एक सशक्त नारी’ या नाट्यप्रयोगातून अभिनेत्री, निर्माती आणि गायिका इंद्राणी मुखर्जी पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरली आहे. ‘इंद्राणी मुखर्जी एंटरप्राइझ’ या तिच्या संस्थेच्या माध्यमातून ती नव्या कलावंतांना व्यासपीठ देण्याचे काम सातत्याने करत आहे. या वेळी तिच्या या पुनरुज्जीवित सादरीकरणाने मुंबईकर प्रेक्षकांची मने पुन्हा जिंकली.