
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहला टक्कर देण्यासाठी झी मराठीने त्यांचा हुकुमाचा एक्का बाहेर काढला आहे. झी मराठीवर गाजलेली मालिका देवमाणूस मालिकेचा नवीन सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. देवमाणूस मधला अध्याय असं या नव्या भागाचं नाव आहे. गावातून गायब झाल्यावर आणि फाशी होण्यापूर्वीच्या मधल्या काळात देवीसिंह नेमकं काय करत होता याची गोष्ट या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.