Inside Out 2: 'इन्साईड आऊट २'चा जबरदस्त रेकॉर्ड! ठरला कमी वेळात सर्वाधिक कमाई करणारा पहिला अ‍ॅनिमेशनपट

Inside Out 2 Box Office : हा चित्रपट प्रदर्शनानंतर अतिशय कमी कालावधीत अब्जाधीश होणारा एकमेव अ‍ॅनिमेशनपट ठरला आहे.
inside out
inside out sakal

डिस्नी आणि पिक्सर यांनी संयुक्तरित्या तयार केलेल्या 'इन्साईड आऊट' चित्रपटाचा पुढचा भाग 'इन्साईड आऊट - 2' हा ऍनिमेशनपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता या चित्रपटाने एक मोठा रेकॉर्ड केला आहे. कारण जगभरातील बॉक्स ऑफिसवर 'इन्साईड आऊट - 2' चित्रपटाचीच क्रेझ पाहायला मिळत आहे. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत या चित्रपटाने केवळ 3 आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत जगभरातून १०० कोटींची डॉलर्सची कमाई केली आहे. म्हणूनच सर्वात कमी कालावधीत १०० कोटी कमावणाऱ्या चित्रपटांमध्ये समाविष्ट होणारा 'इन्साईड आऊट - 2' हा एकमेव अ‍ॅनिमेटेड चित्रपट ठरला आहे.

इन्साईड आऊट - 2 या चित्रपटाने केलेल्या या कामगिरीमुळे याआधीच्या अनेक चित्रपटांचे विक्रम मोडीत निघाले आहेत. याआधी फ्रोझन - 2 या ऍनिमेशन चित्रपटाने 25 दिवसांत १०० कोटींची कमाई केली होती. इन्साईड आऊट - 2 या चित्रपटाने भारतातही उत्तम प्रतिसाद मिळवला आहे. या चित्रपटाने भारतात केवळ 19 दिवसात 101.48 कोटींची (12.7 दशलक्ष डॉलर्स) कमाई केली आहे. भारतातही सर्वात जलद गतीने 100 कोटी कमावणाऱ्या अ‍ॅनिमेशन चित्रपटांच्या यादीत इन्साईड आऊट - 2 या चित्रपटाने वरचा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, भारतात 100 कोटी किंवा त्याहून अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतील 11 पैकी 8 चित्रपट डिस्ने आणि पिक्सरचे आहेत.

इन्साईड आऊट - 2 या चित्रपटातील पात्रांच्या भावनिक प्रवासाने जगभरातील प्रेक्षकांना आपलंसं केलं. मानवी भावनांचे प्रतिनिधित्व करणारी पात्र सादर करून आपल्या अंतर्मनातील जगात सुरू असलेल्या गुंतागुंतीच्या खोलवर जात या चित्रपटाने बच्चे कंपनीसह सगळ्यांना वेड लावलं. या चित्रपटाला समीक्षकांनीही चांगली पावती दिली आहे.

केल्सी मॅन यांनी दिग्दर्शित केलेला इन्साईड आऊट - 2 हा चित्रपट 14 जून 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. एमी पोहलर, माया हॉक, फिलीस स्मिथ, लुईस ब्लॅक, टोनी हेल आणि लिझा लापिरा यांनी या चित्रपटातील प्रेक्षकांच्या लाडक्या ऍनिमेटेड पात्रांना आवाज दिला आहे. मेग लेफोव यांनी लेखन केलेल्या या अ‍ॅनिमेटेड चित्रपटाने भारतातील आणि जगभरातील चित्रपटगृहांमध्ये पिक्सरची जादू कायम ठेवली आहे.

inside out
Prarthana Behere Video: दोन 'मितवा' पुन्हा आल्या एकत्र... प्रार्थना बेहेरेच्या व्हिडीओमध्ये दडलंय खास सरप्राईज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com