

inspector manju heroin
ESAKAL
मालिकेतील मुख्य कलाकाराच्या तब्येतीमुळे अनेकदा कथानकात बदल करावे लागतात. मात्र, हे बदल करतानाही प्रेक्षकांचं मनोरंजन कायम ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं. 'सन मराठी'वरील 'इन्स्पेक्टर मंजू' या मालिकेने हे अगदी सहज साध्य केलं आहे. सध्या मालिका एका रंजक वळणावर आली आहे. मालिकेत आर्यनने मंजूच्या डोळ्यांत लाल तिखट टाकल्याने तिची दृष्टी गेल्याचं दाखवण्यात आलं. या ट्रॅकमुळे काही दिवस मंजू मालिकेत दिसली नाही आणि अनेक प्रेक्षकांना तिने मालिका सोडल्याचा गैरसमज झाला. मात्र, आता मंजू पुन्हा पूर्वीप्रमाणे प्रत्येक भागात दिसू लागल्याने प्रेक्षकांच्या मनाला दिलासा मिळाला आहे.