
जम्मू-काश्मीरमधील सुप्रसिद्ध रेडिओ जॉकी (आरजे) सिमरन सिंहने गुरुग्राममधील सदर पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या घरात आत्महत्या केली आहे. आत्महत्येची माहिती पोलिसांना मिळाली होती. शवविच्छेदनानंतर मृतदेह गुरुवारी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. आरजे सिरमनचे गुरुग्राममध्ये निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच सर्वत्र खळबळ उडाली. या प्रकरणी गुरुग्राम पोलीस तपासात गुंतले आहेत.