IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

IPL 2024: शाहरुख खानच्या टीममधील एक स्टार खेळाडू बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
IPL 2024
IPL 2024esakal

IPL 2024: सध्या देशभरात आयपीएलची (IPL 2024) क्रेझ बघायला मिळत आहे. आयपीएलची ट्रॉफी कोणती टीम जिंकणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा मालक शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशाह म्हटलं जात. अशातच आता शाहरुख खानच्या टीममधील एक स्टार खेळाडू बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या खेळाडूच्या बॉलिवूड एन्ट्रीची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

आंद्रे रसेल करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू

आंद्रे रसेल हा कोलकाता नाईट रायडर्स या टीममधील स्टार खेळाडू आहे. तो पलाश मुच्छाळच्या म्युझिक व्हिडीओमध्ये काम करणार आहे. पलाश हा क्रिकेटर स्मृती मानधनाचा बॉयफ्रेंड आहे. पलाश हा संगीत दिग्दर्शनासोबतच चित्रपट दिग्दर्शन देखील करतो. पलाशने त्याच्या इंस्टाग्रामवर आंद्रे रसेलचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये आंद्रेनं क्लॅपबोर्ड धरलेला दिसत आहे. या क्लॅपबोर्डवर 'लडकी तू कमल की', असे लिहिलेले दिसत आहे. पलाशने या फोटोला कॅप्शन दिलं, 'मी यासाठी खूप उत्सुक आहे."

IPL 2024
KKR vs DC : 'टॉससाठी नव्हतं यायला पाहिजे मग!', श्रेयस अय्यरला असं का म्हणाले संजय मांजरेकर?

नेटकऱ्यांनी केला लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

पलाशनं शेअर केलेल्या आंद्रे रसेलच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभिनेता हितेन तेजवानी आणि आविका गौर यांनी पलाशनं शेअर केलेल्या फोटोला कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं फोटोला कॅप्शन दिलं,"या अष्टपैलू खेळाडूचा नवा अवतार पाहून आम्ही खूप उत्सुक झालो आहेत." आंद्रे रसेलच्या या नव्या प्रोजेक्टबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक खूप उत्सुक आहे.

आंद्रे रसेलसाठी यंदाची आयपीएल इनिंग खास होती. त्याने आतापर्यंत 9 सामने खेळले असून त्यामध्ये त्यानं 179 रन्स केले आहेत. त्याने नऊ सामन्यांत 9 विकेट्स देखील घेतल्या आहेत. आंद्रे रसेलच्या केकेआर या टीमनं आतापर्यंत नऊ सामने खेळले असून त्यात सहा जिंकले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com