
Bollywood Entertainment News : दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिलचा व्हिडीओ व्हायरल झालाय. इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बाबिलने स्टोरी पोस्ट करत खळबळजनक खुलासे केले. त्याने काही व्हिडीओ शेअर करत बॉलिवूड इंडस्ट्रीवर धक्कादायक आरोप केले. हे सगळं व्यक्त करत असताना बाबिल ढसढसा रडला. पण हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर बाबिलने काही वेळातच हा व्हिडीओ डिलीट केला पण हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.