Babil Khan: 'बाबांजवळ जावंसं वाटतंय'; इरफान खान यांच्या लेकाच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Babil Khan: इरफानचा मुलगा बाबिल खान (Babil Khan) यानं शेअर केलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
Babil Khan
Babil Khanesakal

Babil Khan: अभिनय सम्राट इरफान खान (Irrfan Khan) यांना आजही अनेकजण मिस करतात. अंग्रेजी मिडीयम, पान सिंग तोमर, पिकू, कारवा, लाईफ ऑफ पाय या सिनेमांमधील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. इरफान यांनी 4 वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतला . इरफानचा मुलगा बाबिल खान (Babil Khan) यानं शेअर केलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

बाबिलने 24 एप्रिलला रात्री सोशल मीडियावर त्याच्या वडिलांच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली. "कधी कधी मला हार मानावीशी वाटते आणि सगळं सोडून बाबांकडे जावंसं वाटतं" असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं. त्याच्या या पोस्टने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. या पोस्टविषयी चर्चा सुरू असतानाच काही वेळाने त्याने ही पोस्ट सोशल मीडियावरून डिलीट केली. त्यामुळे अनेकांना त्याच्याबद्दल काळजी वाटू लागली आहे.

बाबिलच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्याच्या इतर फोटोवर कमेंट करत त्याला धीर धरण्याचा सल्ला दिला आहे. "बाबिल तुझे बाबा हार मानणारे नव्हते." , "तू हार मानू नकोस" अशा अनेक कमेंट्स त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी केल्या आहेत.

Babil Khan
Babil Khanesakal

कला, फ्रायडे नाईट प्लॅन, द रेल्वे मॅन या प्रोजेक्टसमधून बाबिलने प्रेक्षकांचं मन जिंकलं आणि आता तो द उमेश क्रॉनिकल्स या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात तो अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करतोय. बाबिलने कॅमेरा असिस्टंट म्हणून करिअरची सुरुवात केली. करीब करीब सिंगल या सिनेमासाठी त्याने कॅमेरा असिस्टंटचं काम केलं होतं. तर कला सिनेमातील त्याचा अभिनयही अनेकांना आवडला. या सिनेमात त्याने जगन बटवाल ही भूमिका साकारली होती आणि या भूमिकेसाठी त्याला झी सिने अवॉर्ड्स आणि आयफा अवॉर्ड्सच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता पदार्पण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

इरफान यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटूंबात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. बाबिलची आई आणि इरफारनच्या पत्नी सुतापा यांना इरफान यांच्या निधनाचा बराच धक्का बसला होता. यातून त्यांना सावरायला बराच काळ गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com