

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांनी आपल्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपटात काम केलं. त्यांनी केलेली प्रत्येक भूमिका त्यांनी जिवंत केली. मात्र २०२० मध्ये सिनेसृष्टीचा हा हिरा प्रेक्षकांनी गमावला. निधनावेळी ते फक्त ५३ वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं कर्करोगाने निधन झालं होतं. मात्र 'मकबूल', 'द लंचबॉक्स', 'हैदर' सारख्या चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या इरफान यांना दिग्दर्शकाने सेटवर शिवीगाळ केली होती.