

shreyas ayer
ESAKAL
बॉलिवूड आणि क्रिकेट यांचं फार जवळचं नातं आहे. अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींसोबत लग्नगाठ बांधलीये. झहीर खान- सागरिका घाटगे, विराट कोहली- अनुष्का शर्मा, अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आता या नावांच्या यादीत आणखी एक नाव जोडलं जाण्याची शक्यता आहे. हा क्रिकेटपटू आहे टीम इंडियाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान खेळल्या गेलेल्या वनडे सीरिजमध्ये श्रेयस नुकताच भारताचा उपकर्णधार दिसला होता. या सीरिजमध्ये त्याला गंभीर दुखापत झालेली. आता एकीकडे त्याच्या प्रकृतीच्या चर्चा सुरू आहेत तर दुसरीकडे त्याच्या डेटिंगच्या चर्चांनी जोर धरलाय.