

ISHA KESKAR EXIT FROM LAXMICHYA PAVALANNI
ESAKAL
छोट्या पडद्यावरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. त्यातलीच एक गाजणारी मालिका म्हणजे 'लक्ष्मीच्या पावलांनी. लोकप्रिय मराठी अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता अक्षर कोठारी या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माणम केलं. कला आणि अद्वैत यांची जोडीही प्रेक्षकांना भावली. कलाचं स्वतःच्या हक्कांसाठी आणि चुकीच्या गोष्टींविरोधात उभं राहणं प्रेक्षकांना आवडलं. त्यामुळेच ही मालिका टीआरपी यादीत टॉप ५ मध्ये होती. मात्र आता ईशा केसकर ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्यात. मालिकेचा नवा प्रोमो त्याला कारण ठरलाय.