

amol kolhe on savitribai phule serial
esakal
स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या नवीन मालिकांचा बोलबाला आहे. मात्र त्यासाठी काही जुन्या मालिका बंद करण्यात येतायत. ज्या मालिकांच्या कथा संपून पूर्ण चोथा झालाय अशा मालिका पाणी टाकून टाकून चालवल्या जातायत. मात्र ज्या मालिका खरंच प्रेक्षकांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवून आणू शकतात अशा मालिका मात्र बहिणीकडून बंद करण्यात येतायत. शीच एक मालिका म्हणजे 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले'. स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, समाजातील जातिभेदाला आव्हान देणा, अंधश्रद्धेच्या विरुद्ध ठाम उभे राहणाऱ्या फुले दाम्पत्याची कथा स्टार प्रवाहवर दाखवण्यात येत होती. मात्र आता ही मालिका बंद करण्यात येत आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतः याबद्दल सांगितलं आहे.