
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सोनी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने प्रेक्षकांना कोविड काळात तारलं, जगायची उभारी दिली, हसायला शिकवलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना ओळख मिळवून दिली. हक्काचा मंच दिला. गौरव मोरे, ओंकार भोजने, वनिता खरात, अशा अनेक कलाकारांना या मंचाने ओळख मिळवून दिली. अशातच या कार्यक्रमातली आणखी एक यशस्वी ठरलेली गोष्ट म्हणजे प्राजक्ता माळीचं सूत्रसंचालन. मात्र आता प्राजक्ताने हा कार्यक्रम सोडला असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात.