‘धुरंधर’च्या सेटवर रणवीर सिंगसाठी खरंच तीन व्हॅनिटी होत्या? अखेर चर्चांना पूर्णविराम, रेडिटच्या दाव्याचं सत्य काय?

DHURANDHAR MOVIE RANVEER SINGH REALITY: 'धुरंधर'च्या सेटवर रणवीर सिंगने तीन व्हॅनिटी व्हॅन मागवल्या होत्या अशा चर्चा होत्या. रेडिटवर असा दावा करण्यात आलेला. आता त्यावर उत्तर मिळालंय.
RANVEER SINGH

RANVEER SINGH

ESAKAL

Updated on

गेल्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर धुरंधर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटातील प्रत्येक लहान-मोठ्या बाबीकडे बारकाईने लक्ष द्यायला सुरुवात केली. संवाद, पार्श्वसंगीत, दृश्यरचना ते अगदी एंड क्रेडिट्सपर्यंत सर्व काही चर्चेत आले. त्याचदरम्यान कलाकारांच्या सुविधांबाबत, विशेषतः रणवीर सिंगच्या वॅनिटी व्हॅनविषयी पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली. मागील वर्षी रणवीर सिंग चित्रपटांसाठी तीन वॅनिटी व्हॅन वापरतो, अशा बातम्या समोर आल्या होत्या. मात्र या दाव्याला कधीही अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. धुरंधरच्या एंड क्रेडिट्सनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा ही बाब चर्चेत आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com