

bigg boss marathi 6
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ६' सध्या चांगलाच चर्चेत आहे. यावेळेस घरात १७ स्पर्धक आले आहेत. पहिल्या दोन आठवड्यात घरात चांगलाच राडा पाहायला मिळालाय. सगळे स्पर्धक एकमेकांशी भिडताना दिसले. कधी तोंडाने तर शक्तीने. भाऊच्या धक्क्यावर या सगळ्यांची शाळा घेण्यात आली. घरात हे स्पर्धक काय काय करतात या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होत असतात. अशातच आता 'बिग बॉस'च्या घरातला एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून सगळेच चकीत झालेत. या व्हिडिओमध्ये चक्क सागर कारंडे तंबाखू खाताना दिसतोय.