

NILESH SABALE ON SHAH RUKH KHAN
ESAKAL
छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या कार्यक्रमांपैकी एक म्हणजे 'चला हवा येऊ द्या'. असा कोणता कलाकार नाही ज्याने आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या सेटवर हजेरी लावली नाही. मराठीसोबतच अनेक हिंदी कलाकारदेखील या मंचावर येऊन गेलेत. २०१८ मध्ये अभिनेता शाहरुख खानदेखील या मंचावर आला होता. त्याच्या 'जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो अनुष्का शर्मासोबत इथे आला होता. त्यावेळेस शाहरुख आणि अनुष्का यांनी दादा कोंडकेंच्या गाण्यांवर नाचत या सेटवर आला होता. आता या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आणि दिग्दर्शक निलेश साबळे याने तेव्हा त्यांनी शाहरुखला कसं मनवलेलं याबद्दल सांगितलं आहे.