
शाहिद आणि मीरा यांनी २०१५ मध्ये लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्या नात्यात एक मजबूतपणा दिसतो. त्यांचं कार्यक्रमामधील वावरणं असो किंवा इतर गोष्टी ते दोघे परफेक्ट कपल प्रमाणे दिसतात. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहिदने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्याने मीरा आणि त्याच्यामधील नात्याबद्दल सांगितलं. परफेक्ट लग्नासारख्या गोष्टी अस्तित्वात नाहीत असं तो म्हणाला. त्यानंतर मात्र नेटकऱ्यांच्या भुवया यांचावल्या आहेत.