

ALIA BHATT VS SHARDHA KAPOOR
ESAKAL
Bollywood News: बॉलिवूडमध्ये अनेक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांच्या कामावर आणि त्यांच्या लोकप्रियतेवर या कलाकारांचं मानधन ठरतं. या अभिनेत्रींच्या यादीत आलिया भट्ट, जान्हवी कपूर, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांचा समावेश होतो. आलिया भट्ट हिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. सोबतच श्रद्धादेखील चाहत्यांची लाडकी अभिनेत्री आहे. मात्र श्रद्धा कपूरचे वडील शक्ती कपूर यांनी नुकतंच एक वक्तव्य केलंय ज्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात. श्रद्धा इतर अभिनेत्रींपेक्षा जास्त मानधन घेत असल्याचं ते म्हणालेत. पण या दाव्यामध्ये किती तथ्य आहे?