

NEENA GUPTA
ESAKAL
बॉलिवूडच्या बेधडक आणि बिनधास्त अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीचा समावेश होतो त्या म्हणजे नीना गुप्ता. नीना कायमचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत असतात. नीना यांनी आजवर असे काही निर्णय घेतले ज्यामुळे पाहणारे चकीत झाले. असाच एक निर्णय होता मसाबाच्या जन्माचा आणि दुसरा निर्णय होता पन्नाशीत लग्न करण्याचा. स्त्रियांसाठीच्या सगळ्या अटी, बंधनं तोडून त्यांनी स्वतःचं अस्तिव दाखवून दिलं. त्यांनी स्वतःच्या विचारांना जपत निर्णय घेतले. आता नीना पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्याचं कारण म्हणजे रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नातील व्हायरल व्हिडिओ. या व्हिडिओमुळे त्या गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.