

isha keskar
esakal
'बानू' बनून प्रेक्षकांची मनं जिंकणारी लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकर मोठ्या पडद्यावरही झळकलीये. तिने 'जय मल्हार', 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ती 'सरला एक कोटी' साठी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. ईशाने गुरुनाथची शनाया म्हणूनही प्रेक्षकांच्या मनात घर केलं. नुकतीच ती 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेत दिसली. तिने अचानक या मालिकेतून एक्झिट घेतली. मात्र ईशाचं बालपण इतरांसारखं नव्हतं. तिचा सांभाळ तिच्या आई-वडिलांनी केलाच नाही. सहाव्या महिन्यापासून ती पाळणाघरट वाढलीये असं तिने एका मुलाखतीत सांगितलेलं.