

JAB WE MET
ESAKAL
बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट बनत असतात. वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या गोष्टी त्यातून सांगितल्या जातात. कधी भयपट तर कधी प्रेमकथा यातून दिग्दर्शक प्रेक्षकांना वेगवेगळ्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. असाच एक लोकप्रिय चित्रपट जो २००७ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने तरुणाईच्या मनावर गारुड घातलं होतं. हिंदी रोमँटिक कॉमेडी ड्रामा असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. यात शाहिद कपूर आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट म्हणजे 'जब वी मेट'. मात्र या चित्रपटात शेवटच्या गाण्यात एक कधीही न पाहिलेली गोष्ट दाखवण्यात आली. जी कदाचित प्रेक्षकांनी नीट पाहिलीच नाही.