

JACKIE SHROFF FARMHOUSE
ESAKAL
अभिनेते नाना पाटेकर यांच्या फार्महाउसमध्ये अनेक कलाकार आणि राजकीय नेते मंडळी यायची. त्यामुळे त्यांचं फार्महाउस कायम चर्चेत असायचं. मात्र बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांचं फार्महाउसदेखील पुण्यातच आहे. जॅकी यांचं १० एकरात पसरलेलं भलं मोठं आणि आलिशान फार्महाउस आता चर्चेचा विषय बनलंय. इथे ते बरीच पिकं घेतात. सोबतच त्यांनी अनेक झाडं देखील लावली आहे. ग्रीन फार्महाऊस असं त्यांच्या फार्महाऊसचं नाव आहे. या जागेत कोंबड्या आणि बदकांचं पालनही केलं जातं.