

jackie shroff
esakal
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारे चाहत्यांचे लाडके अभिनेते जॅकी श्रॉफ आज प्रचंड लोकप्रिय आहे. ते नेहमी स्वतःसोबत झाड घेऊन फिरतात आणि इतरांनाही झाडं लावण्याचा संदेश देतात. अत्यंत मनमोकळ्या स्वभावाचे जॅकी श्रॉफ कायमच चाहत्यांचे लाडके होते. त्यांनी आपलं बालपण मुंबईतल्या चाळीत घालवलं. तिथेच त्यांना भेटायला मोठमोठे प्रोड्युसरदेखील यायचे. मात्र जसे जसे ते कमावत गेले. तास त्यांनी एक नवीन बंगला विकत घेतला. मात्र त्या बंगल्याची एक कटू आठवण कायम त्यांच्या मनात कोरली गेली. ती आठवण आहे त्यांच्या आईबद्दल.