

kiran mane on janhavi killekar
ESAKAL
चार दिवसांपूर्वीच दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. त्यानिमित्ताने अनेक कलाकारांना ठिकठिकाणी येण्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं. या कलाकारांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात अभिनेत्री जान्हवी किल्लेकरचा देखील एक व्हिडीओ आहे जो सध्या चर्चेचा विषय बनलाय. तिने एके ठिकाणी हजेरी लावली होती. त्यात तिच्यासोबत रीलस्टार प्रणाली सूर्यवंशीदेखील होती. दोघीही एकत्र स्टेजवर असतानाही समोर असलेले प्रेक्षक मात्र रीलस्टार प्रणालीसाठी ओरडताना दिसले. तेव्हा जान्हवीने तोंड वाकडं केलं. शिवाय जेव्हा जान्हवीच्या हातात माइक असतानाही तिला तो माइक प्रणालीला द्यायला सांगितला त्यामुळे तर ती आणखीनच संतापली. ती मागे वळून आयोजकांवर ओरडताना दिसतेय. आता या व्हिडिओवर अभिनेते किरण माने यांनी त्यांचं मत मांडलंय.