

jay shree ram movie
esakal
अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर उभं राहिल्यानंतर पाकिस्तानमध्ये नेमकी कोणती घटना घडली होती? या घटनेमागचं सत्य काय होतं? अनेकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या चित्तथरारक घटनेची कहाणी आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'जय श्री राम' या आगामी मराठी चित्रपटातून हा विषय प्रेक्षकांसमोर मांडला जाणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे.