
सध्या मराठी रंगभूमी गाजवत असलेलं नाटक म्हणजे 'जर तरची गोष्ट'. प्रिया बापट, उमेश कामत, आशुतोष गोखले, पल्लवी अजय यांची मुख्य भूमिका असलेलं हे नाटक प्रेक्षकांना खूप पसंत पडलंय. रिलेशनशिपवर भाष्य करणाऱ्या या नाटकाने प्रेक्षकांची अल्पावधीतच मनं जिंकली आहेत.
इरावती कर्णिक लिखित या नाटकात समर आणि राधा या दोघांची गोष्ट पाहायला मिळते. एकमेकांपासून डिव्होर्स झाल्यानंतर अचानक ते दोघे पुन्हा एकमेकांसमोर येतात आणि पुढे काय घडतं याची या नाटकातून उलगडते. या नाटकाचं हटके कथानक सगळ्यांना आवडत आहेच पण त्यासोबतच नाटकाच्या टीमने प्रेक्षकांना एक खास सरप्राईजसुद्धा दिलं. आज म्हणजे ७ एप्रिल २०२४ ला नाटकाचा १०० वा प्रयोग पार पडणार आहे. या निमित्ताने नाटकाच्या निर्मात्यांनी या नाटकाचं टायटल ट्रॅक 'जर तरचं गाणं' म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर रिलीज केलं. प्रिया बापटने गायलेलं हे गाणं प्रेक्षकांना पसंत पडलेलं होतं आणि आता कोणत्याही ऑडिओ प्लॅटफॉर्मवर आणि कधीही हे गाणं ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
जिओ सावन, अँपल म्युझिक, स्पॉटीफाय, अमेझॉन म्युझिक, युट्युब म्युझिक आणि युट्युब या प्लॅटफॉर्म्सवर हे गाणं उपलब्ध आहे. प्राजक्त देशमुख याने हे गाणं लिहिलं असून श्रीनाथ म्हात्रेने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.
प्रियाने या आधीही एका गाण्याला आवाज दिला आहे. वजनदार सिनेमातील 'गोलू पोलू' हे गाणं प्रियाने गायलं होतं आणि गायक रोहित राऊतने तिला साथ दिली होती. तिचं हे गाणंसुद्धा हिट झालं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.